ओमिक्रॉन पुन्हा डोके वर काढतोय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओमिक्रॉन पुन्हा डोके वर काढतोय!
ओमिक्रॉन पुन्हा डोके वर काढतोय!

ओमिक्रॉन पुन्हा डोके वर काढतोय!

sakal_logo
By

ओमिक्रॉन डोके वर काढतोय
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा ओमिक्रॉन डोके वर काढत असल्याचे एकंदरीत महापालिकेने केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. आतापर्यंत ९९.६३ टक्के नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन सापडला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे, पण नागरिकांनीही सर्वाधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यातच जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालातून वारंवार लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. महापालिकेच्या १३ व्या जिनोम सिक्वेन्सिंग अभ्यासातून असे दिसून आले होते, की बाधित रुग्णांपैकी ४० टक्के लसीकरण न केलेले होते. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. महापालिकेने चौथी लाट सुरू झाल्यापासून म्हणजेच जानेवारी ते जूनदरम्यान एकूण पाच जिनोम सिक्वेन्सिंग केले आहे. त्यातील आठव्या फेरीतील जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालातून ओमिक्रॉनने ८९ टक्के डेल्टाची जागा घेतल्याचे निदर्शनास आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87407 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..