मुंबईत जोरदार सरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत जोरदार सरी
मुंबईत जोरदार सरी

मुंबईत जोरदार सरी

sakal_logo
By

मुंबईत ‘ऑरेंज अलर्ट’
मुंबई : हवामान विभागाने मुंबईत पुढील काही दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. दरम्यान, आज सकाळपासून जोरदार सरी कोसळल्या. विशेषतः पश्चिम उपनगराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पाणी साचल्याने अंधेरी सबवे येथील वाहतूक गोखले मार्गावर वळवण्यात आली. मुंबईत सकाळपासून पावसाने जोर धरल्याने अनेक ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. काही ठिकाणी पाणी साचण्याचेही प्रकारही घडले. महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात खड्ड्यांमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली, तर अंधेरी पश्चिम येथे मेट्रो मार्गाखाली पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. कॉटन ग्रीन परिसरातही काही ठिकाणी पाणी साचले होते. दिवसभरात कुलाबा वेधशाळा येथे १२५ तर सांताक्रूझ येथे ५२ मिमी पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पावसाचा जोर थोडासा कमी झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87465 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..