गणेशोत्सवासाठी कोकणात मध्य रेल्वेच्या ७४ विशेष गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवासाठी कोकणात मध्य रेल्वेच्या ७४ विशेष गाड्या
गणेशोत्सवासाठी कोकणात मध्य रेल्वेच्या ७४ विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणात मध्य रेल्वेच्या ७४ विशेष गाड्या

sakal_logo
By

चाकरमान्यांसाठी यंदा
७४ विशेष रेल्वे धावणार
मुंबई, ता. २ : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने यंदा ७४ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), पनवेल, नागपूर, पुणे आदी स्थानकातून करमाळी, सावंतवाडी आणि मडगाव स्थानकांसाठी या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. सोमवार, ४ जुलैपासून प्रवासी विशेष रेल्वेचे आरक्षण करू शकणार आहे.
मध्य रेल्वेवरून मुंबई-सावंतवाडी ही दैनिक विशेष (४४ फेऱ्या) रेल्वे २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान धावणार आहे. ट्रेन क्र. ०११३७ सीएसएमटी येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत दररोज मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी दुपारी २ला पोहोचेल. तर, ट्रेन क्र. ०११३८ ही विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत दररोज दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल. नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (१२ फेऱ्या) गाडी २४ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२२ दरम्यान धावणार आहे. ट्रेन क्र. ०११३९ विशेष रेल्वे नागपूर येथून २४ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत दर बुधवार आणि शनिवारी दुपारी ३.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल. तर, ट्रेन क्र. ०१११४० ही विशेष रेल्वे मडगाव येथून २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत दर गुरुवार आणि रविवारी सायंकाळी ७ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल. या शिवाय पुणे ते कुडाळ विशेष (६ फेऱ्या), पुणे-थिविम (६ फेऱ्या) आणि पनवेल-कुडाळ (६ फेऱ्या) अशा ७४ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87625 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..