
मध्य रेल्वेची सर्वोत्तम कामगिरी
मध्यरेल्वेची उच्चांकी मालवाहतूक
मुंबई : मध्य रेल्वेने पहिल्या तिमाहीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करत २१.६२ दशलक्ष टन मालवाहतूक केली. याशिवाय जूनमध्ये ७.१९ दशलक्ष टन मालवाहतूक करून मध्य रेल्वेने नवा विक्रम नोंदवला आहे. २०२१-२२ च्या मागील सर्वोत्तम पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षात मालवाहतुकीत १६.६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने सर्वोत्तम कामगिरी करत जून २०२२ मध्ये ७.१९ दशलक्ष टन मालवाहतूक केली. गेल्या वर्षी जून २०२१ मध्ये ५.९७ दशलक्ष टन मालवाहतूक होती. त्या तुलनेत यंदा जूनमध्ये मालवाहतुकीत २०.४४ टक्के वाढ आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जूनदरम्यान २१.६२ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली, तर एप्रिल ते जूनदरम्यान, १८.५४ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली गेली. पहिल्या तिमाहीतील मालवाहतूक ही कोणत्याही आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील आतापर्यंतची सर्वोत्तम मालवाहतूक आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87689 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..