मध्य रेल्वेची फुकट्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेची फुकट्यांवर कारवाई
मध्य रेल्वेची फुकट्यांवर कारवाई

मध्य रेल्वेची फुकट्यांवर कारवाई

sakal_logo
By

फुकट्या प्रवाशांकडून १०३ कोटी वसूल
मुंबई : मध्य रेल्वेद्वारे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यानुसार मागील तीन महिन्यांत फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून १०३ कोटी ३९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने एप्रिल २०२२ ते जून २०२२ या कालावधीत ही कारवाई केली. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते जून २०२२ या पहिल्या तिमाहीत विनातिकीट, अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची वाहतूक करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. जूनमध्ये मध्य रेल्वेने बुक न केलेल्या सामानासह विनातिकीट, अनियमित प्रवासाच्या ४.८३ लाख प्रकरणांद्वारे ३१.७८ कोटींचा महसूल मिळविला आहे. एप्रिल-जून २०२२ या पहिल्या तिमाहीत, विनातिकीट, अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण १४.९४ लाख प्रकरणे आढळून आली आहेत, तर मागील वर्षी याच कालावधीत ५.०४ लाख प्रकरणे आढळून आली असून त्यात १९६.३२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87712 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..