तलासरीतील झाई आश्रमशाळेत विषबाधा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलासरीतील झाई आश्रमशाळेत विषबाधा?
तलासरीतील झाई आश्रमशाळेत विषबाधा?

तलासरीतील झाई आश्रमशाळेत विषबाधा?

sakal_logo
By

आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचा
संशयास्पद मृत्यू; ११ मुले गंभीर
बोर्डी : तलासरी तालुक्यातील एका शासकीय आश्रमशाळेतील चौथी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ९) घडली. सारिका भरत निमला (९) असे तिचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर आश्रमशाळेतील एकूण २२ मुलांची तपासणी करण्यात आली. त्यातील ११ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना डहाणूतील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सारिकाला डोकेदुखीमुळे गुजरातमधील देहरी रुग्णालयात तपासणी करून औषधे देण्यात आली होती; परंतु आज सकाळी अचानक ती बेशुद्ध पडली. तिला घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिला डहाणू कुटीर रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे निश्चित कारण सांगता, येईल असे प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी सागितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88372 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..