वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटले
वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटले

वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटले

sakal_logo
By

मुंबईत मोटार चालकाने
पोलिसाला नेले फरफटत
नवी मुंबई, ता.९ : खारघर येथील कोपरागाव पुलाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारीला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर चालकाने गाडी घातल्याचा प्रकार आज सकाळी घडला. पोलिसाने स्वत:ला वाचविण्यासाठी बॉनेट पकडल्यानंतरही चालकाने मोटार न थांबवता पोलिसाला अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. इतर पोलिसांनी या मोटारीचा पाठलाग करून अडविल्यानंतर या पोलिसाची सुटका झाली. या सर्व घटनाक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याप्रकरणी चालक आकाश जांगीड (वय ३५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहतूक पोलिस नामदेव गादेकर त्यात जखमी झाले आहेत.
ते खारघर वाहतूक शाखेत कार्यरत असून, शनिवारी सकाळी ते कोपरा पुलाजवळ कर्तव्य बजावत होते. कोपरा गाव सेक्टर-१० येथून विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारीला थांबवण्यासाठी ते गेले असताना आकाशने गादेकर यांच्या अंगावर मोटार घातली. त्यानंतर गादेकर यांना बॉनेटवर लटकलेल्या अवस्थेत भरधाव वेगात अर्धा किलोमीटरपर्यंत नेले. वाहतूक पोलिस नाईक निवृती भोईर यांनी पाठलाग करून अन्य चालकांच्या मदतीने मोटार थांबवत गादेकर यांची सुटका केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88384 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..