
मुंबईत दहा हजारांवर खड्डे
मुंबईत दहा हजारांवर खड्डे
मुंबई : मुंबईत आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून मार्ग काढण्यासाठी मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या खड्ड्यांची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत मुंबईकरांकडून महापालिकेकडे तक्रारी करण्यात येत आहे. मोबाईल ॲप, समाज माध्यमांद्वारे महापालिकेकडे आतापर्यंत १० हजारांपेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. मोबाईल ॲपवरून दररोज ५० हून अधिक तक्रारी नोंदवल्या जात आहेत. एप्रिलपासून आतापर्यंत ५०० हून अधिक तक्रार ॲपवर प्राप्त झाल्या आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर सरासरी २४ तासांमध्ये त्याबाबत प्रतिसाद नोंदवत तक्रार निकाली काढण्यात येत असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88937 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..