मालगाडीचे १६ डबे घसरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालगाडीचे १६ डबे घसरले
मालगाडीचे १६ डबे घसरले

मालगाडीचे १६ डबे घसरले

sakal_logo
By

मालगाडीचे डबे रुळावरून घसरले
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मंगलमहूड़ी ते लिमखेड़ा स्थानकांदरम्यान मालगाडीचे १६ डबे रुळावरून घसरले. यामुळे दिल्ली ते मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रेल्वेकडून युद्धपातळीवर मालगाडीचे डबे बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील ४४ मेल-एक्स्प्रेस भोपाळ चित्तोडगड आणि पालनपूर मार्गावरून वळविण्यात आल्या असून २६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. रतलाम रेल्वे विभागातील मंगलमहूड़ी ते लिमखेड़ा स्थानकांदरम्यान अप-डाऊन मार्गावर रविवारी रात्री १२.४८ च्या सुमारास मालगाडीचे १६ डबे रुळावरून घसरून एकमेकांना आदळले. या अपघातामुळे ओव्हरहेड वायर तुटल्याने अप-डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली. मडगांव-निजामुद्दीनसह एकूण २६ गाड्या रद्द केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89469 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top