एसटी कर्मचाऱ्याचे पगार आता खासगी बँकेत होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचाऱ्याचे पगार आता खासगी बँकेत होणार
महामंडळाच्या निर्णयामुळे एसटी बँकेवर गंडांतर?

एसटी कर्मचाऱ्याचे पगार आता खासगी बँकेत होणार


मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची पगारदार असलेल्या स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप बँकेला गेल्या काही वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. आता तर चक्क एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना फेडरल बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीसारख्या खासगी बँकांमध्ये वेतन खाते उघडण्यासंदर्भात सूचना देण्यात आले आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे एसटी बँकेवर गंडांतर येणार नाही ना, अशी चर्चा महामंडळात सुरू आहे. राज्यभरात स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकच्या ५० शाखा, तर ११ विस्तार केंद्रे कार्यरत आहे. सुमारे ८१ हजार ३०२ कर्मचारी या बँकेचे सभासद आहे. त्यांचे बहुतांश व्यवहार याच बँकेतून चालतात. एसटी बँकेत दोन हजार २०० कोटींच्या ठेवी, तर १६०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. एकूण सभासदांपैकी ७५ टक्के सदस्यांनी एसटी बँकेचे कर्ज घेतले आहे. पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि स्टेट ट्रन्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकमध्ये वेतन खाते उघडणे बंधनकारक होते; मात्र आता एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना अन्य बँकेत खाते उघडण्याचा सूचना महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांनी दिल्या आहे. याबाबत महामंडळाकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89686 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top