घुसखोरांविरोधात मध्य रेल्वेची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घुसखोरांविरोधात मध्य रेल्वेची कारवाई
घुसखोरांविरोधात मध्य रेल्वेची कारवाई

घुसखोरांविरोधात मध्य रेल्वेची कारवाई

sakal_logo
By

घुसखोरांविरोधात धडक कारवाई
मुंबई : मध्य रेल्वेने माझगाव येथील रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या घुसखोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिस बंदोबस्तात घुसखोरांच्या खोल्या उद्‌ध्वस्त केल्या जात आहेत. `सकाळ`ने गेल्या आठवड्यात याबाबत आवाज उठवताच ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. परंतु बांगलादेशींना आश्रय देणाऱ्या भ्रष्ट रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर प्रशासन केव्हा कारवाई करणार, असा प्रश्न रेल्वे कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. माझगाव येथील गन पावडर रोडवर मध्य रेल्वेची ''सेंट्रल रेल्वे कॉलनी'' आहे. कॉलनीतील धोकादायक इमारतींकडे काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची नजर गेली आणि तेथील खोल्या भाड्याने देण्यास सुरुवात झाली. गेल्या २० वर्षांपासून येथील खोल्या दरमहा १० हजार रुपये दराने भाड्याने दिल्या जात असल्याचा प्रकार ''सकाळ''ने उघडकीस आणला होता. वृत्ताची दखल घेत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी कॉलनीत बेकायदा राहणाऱ्या परप्रांतीयांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89852 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top