सीएसएमटी स्थानकात लोकलची बफरला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएसएमटी स्थानकात
लोकलची बफरला धडक
सीएसएमटी स्थानकात लोकलची बफरला धडक

सीएसएमटी स्थानकात लोकलची बफरला धडक

sakal_logo
By

लोकलची बफरला धडक; ३५ फेऱ्या रद्द
मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएमएमटी स्थानकांवर मंगळवारी (ता. २६) सकाळी ९.३९ वाजता लोकल बफरला धडकण्याची घटना घडली. यामुळे लोकल डब्याचे चाक रुळावरून घसरले. या अपघातामुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक तब्बल अडीच तास विस्कळित झाली होती. परिणामी जवळपास लोकलच्या ३५ फेऱ्या रद्द केल्या. दरम्यान, मध्य रेल्वेने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म एकवरून पनवेलसाठी जाणारी लोकल पुढे जाण्याऐवजी मागे आली आणि बफरला येऊन धडकली. त्यामुळे लोकलच्या चौथ्या डब्याची दोन चाके रुळावरून घसरली. ही घटना सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांच्या सुमारास घडली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90356 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..