
तिच्या अश्रूचा फुटला बांध
नऊ वर्षांनी झाली माय-लेकाची भेट
मुंबई : येथील हार्मोनी फाउंडेशनच्या डॉ. अब्राहम मथाई यांच्या पुढाकारातून निराधार अशा २५ जणांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले तेव्हा सर्वांच्याच अश्रूचा बांध फुटला. मूकबधिर असलेला २० वर्षीय तरुण आयुष अग्रहारी याला त्याचे आई-वडील घ्यायला आले होते. आपल्या मुलाला नऊ वर्षांनी भेटल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिघांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळू लागले. बहुतांश निराधार वयाची ३०-४० वर्षे ओलांडलेले होते. सील आश्रमाच्या सहकाऱ्यांनीही २५ निराधारांना त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मुंबईच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पनवेलमधील सील आश्रमात आधार कार्डकरिता विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत सहकार्य करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले. आधार कार्ड आणि कोविड लसीकरण करून दिले, असे फादर के. एम. फिलिप्स म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90385 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..