Wed, August 10, 2022

रुळाला तडे गेल्याने
‘हार्बर’ची सेवा विस्कळित
रुळाला तडे गेल्याने ‘हार्बर’ची सेवा विस्कळित
Published on : 27 July 2022, 2:39 am
रुळाला तडा; लोकल वाहतूक विस्कळीत
मुंबई : हार्बर मार्गावरील गोवंडी रेल्वेस्थानकाजवळ आज रेल्वेरुळाला तडे गेल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुमारे २० मिनिटांसाठी ठप्प पडली होती. त्यामुळे ऐन कार्यालयात जाण्यावेळी लोकल सेवा ठप्प झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशी लेटमार्क लागला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट क्रमांक १ वर लोकलने बफरला धडक दिल्याने मंगळवारी हार्बर मार्गावरील लोकलची रखडपट्टी झाली होती. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास गोवंडी स्थानकाजवळ डाऊन मार्गावरील रेल्वेरुळाला तडे गेले. त्यामुळे पनवेलकडे जाणारी लोकल फलाटावरच थांबवण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90503 Txt Sindhudurg1
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..