फसव्या कर्ज ॲप्सचे रॅकेट चालवणाऱ्यांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसव्या कर्ज ॲप्सचे रॅकेट चालवणाऱ्यांना अटक
फसव्या कर्ज ॲप्सचे रॅकेट चालवणाऱ्यांना अटक

फसव्या कर्ज ॲप्सचे रॅकेट चालवणाऱ्यांना अटक

sakal_logo
By

मोठ्या कर्ज रॅकेटचा पदार्फाश;
संशयित दहा चिनी नागरिक ताब्यात
मुंबई : भारतात २०१८ पासून चिनी नागरिकांकडून चालवल्या जाणाऱ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कर्ज फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई सायबर पोलिसांनी केला आहे. या कारवाईनंतर तब्बल दहा चिनी नागरिकांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. या दहाजणांनी शेकडो भारतीय तरुणांना फिनटेक कंपन्या आणि कॉल सेंटरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून कर्ज फसवणुकीच्या रॅकेटसाठी पद्धतशीरपणे काम करायला लावले. या माध्यमातून गेल्या चार वर्षांत लाखो भारतीयांची हजारो कोटींची फसवणूक केली.
शेल बनावट कंपन्यांचा वापर करून केलेल्या व्यावसायिक व्यवहारांच्या नावाखाली फसवणुकीचे पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करून चीनमध्ये हस्तांतरित केल्याचा संशय तपासकर्त्यांना आहे. सायबर पोलिसांनी शुक्रवारी (ता.२९) सुनियोजित पद्धतीने चालवल्या जाणाऱ्‍या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि देशाच्या विविध भागातून १४ सदस्यांना अटक केली होती. पोलिसांनी ५० क्रिप्टोकरन्सी वॉलेट हेरले आहेत, ज्याद्वारे शेल कंपन्यांद्वारे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने परदेशात पैसे पाठवण्याचे व्यवहार केले जात होते. २०१८ मध्ये, भारतातील शेकडो तरुणांची भरती केल्यानंतर प्रशिक्षण देण्यासाठी सेमिनार आयोजित करण्यात आले होते. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी या प्रकरणातील मास्टरमाईंडच्या गटाने भारत सोडला; परंतु, या रॅकेटमधील उच्चपदस्थ प्रियांशी कांडपाल (वय२४) ला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g90827 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..