मध्य रेल्वेळा भंगारविक्रीतून १३७ कोटीची कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेळा भंगारविक्रीतून १३७ कोटीची कमाई
मध्य रेल्वेळा भंगारविक्रीतून १३७ कोटीची कमाई

मध्य रेल्वेळा भंगारविक्रीतून १३७ कोटीची कमाई

sakal_logo
By

मध्य रेल्वेला भंगारातून १३५ कोटी
मुंबई : मध्य रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या चार महिन्यांत भंगार विक्रीतून १३५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. मध्य रेल्वेच्या इतिहासात चार महिन्यांच्या कालावधीतील हा सर्वाधिक महसूल असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने शून्य भंगार अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत पाचही विभागांतून या वर्षात एप्रिल-जुलै २०२२ या कालावधीत भंगारातून आतापर्यंतचा १३५.५७ कोटी रुपयांच्या कमाईची नोंद केली आहे. ही मागील वर्षीच्या याच कालावधीत प्राप्त झालेल्या ९८.६७ कोटी रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत ३७.४० टक्के अधिक आहे. मध्य रेल्वेने मिळवलेला १३५.५७ कोटींचा भंगार विक्री महसूल हा एप्रिल ते जुलै या कालावधीतील भंगार विक्रीतून निर्माण झालेला आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91110 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..