१४०० कोटींचे ड्रग्स नालासोपाऱ्यातून जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१४०० कोटींचे ड्रग्स नालासोपाऱ्यातून जप्त
१४०० कोटींचे ड्रग्स नालासोपाऱ्यातून जप्त

१४०० कोटींचे ड्रग्स नालासोपाऱ्यातून जप्त

sakal_logo
By

चौदाशे कोटींचे मेफेड्रोन जप्त
मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स सेलने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर अमली पदार्थ विरोधी पथकाने छापे टाकले. त्यात पोलिसांनी १,४०० कोटी रुपये किमतीचे ७०० किलोंपेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली. त्यात एका महिलेचा समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अलीकडच्या काळात अमली पदार्थ तस्करांविरोधात केलेली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख आणि पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. मेफेड्रोनला म्याव-म्याऊ किंवा एमडी असेही म्हणतात. अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार एमडीवर बंदी आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत असून या रॅकेटमध्ये अजून कोण कोण गुंतलेले आहेत, याचा शोध घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91550 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..