हनी ट्रॅपने ब्लॅकमेल करणारी महिला अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हनी ट्रॅपने ब्लॅकमेल करणारी महिला अटकेत
हनी ट्रॅपने ब्लॅकमेल करणारी महिला अटकेत

हनी ट्रॅपने ब्लॅकमेल करणारी महिला अटकेत

sakal_logo
By

हनी ट्रॅप, खंडणीप्रकरणी
मुंबईत महिलेला अटक
कोल्हापुरातील एकाला होते लुबाडले
मुंबई, ता. १३ : अंधेरीतील हॉटेलमध्ये हनी ट्रॅप लावत ब्लॅकमेल करून कोल्हापुरातील एका व्यावसायिकाकडून ३.३० कोटी रुपये उकळणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. या प्रकरणात संशयित मोनिका चौधरी वर्षभरापासून पसार झाली होती. आज ती पोलिसांना शरण आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः महिलेच्या तीन साथीदारांना अपहरण, खंडणी व गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. २०२१ मध्ये संबंधित व्यावसायिक ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होता, तिथे त्याला भेटायला संशयित महिला गेली होती. महिलेने व्यावसायिकावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्याचा प्रयत्न केला. गुन्हे शाखेच्या युनिट दहाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी व्यावसायिकाकडून ३.३० कोटी रुपये उकळले. या रकमेपैकी मोनिकाला ४५ लाख रुपये मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याआधी मुख्य संशयित लुबना वजीर ऊर्फ ​​सपना हिला फॅशन डिझायनर अनिल चौधरी ऊर्फ ​​आकाश आणि ज्वेलर मनीष सोडीसह अटक करण्यात आली होती. सपनाला ७५ लाख रुपये मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92756 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..