मुंबईत पावसाचे दमदार कमबॅक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत पावसाचे दमदार कमबॅक
मुंबईत पावसाचे दमदार कमबॅक

मुंबईत पावसाचे दमदार कमबॅक

sakal_logo
By

मुंबईत पावसाचे दमदार कमबॅक
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी पुन्हा सकाळपासूनच दमदार पुनरागमन केले. परिणामी अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाली. मुंबईत उद्याही (बुधवारी) हलक्या, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंदमाता, अंधेरी सबवे येथे पाणी साचले होते. हिंदमाता येथे अर्धा फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीची गती मंदावली होती. परळ परिसरात जाणाऱ्या रूग्णांना आणि नातेवाईकांनाही पाण्यातून मार्ग काढावा लागला. महालक्ष्मी जंक्शन, ताडदेव येथेही अर्धा फूट पाणी साचले होते. सक्कर पंचायत वडाळा, पूनम चेंबर्स रस्ता, जे.जे. पुलावरील दक्षिणेकडे जाणारा रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीची गती मंदावली होती. मालाड भुयारी मार्गही जलमय झाला होता. शहरी भागात आज ४४, पूर्व उपनगरात ३६.५५ तर पश्चिम उपनगरात ४९.१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g93295 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..