निर्देशांकांमध्ये किरकोळ घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांकांमध्ये किरकोळ घसरण
निर्देशांकांमध्ये किरकोळ घसरण

निर्देशांकांमध्ये किरकोळ घसरण

sakal_logo
By

शेअर निर्देशांकात किरकोळ घसरण
मुंबई ः संमिश्र जागतिक शेअरबाजार आणि देशांतर्गत कोणतेही ठोस संकेत नसल्याने भारतीय शेअरबाजारांमध्ये आज किरकोळ घसरण झाली. सेन्सेक्स ४८.९९ अंशांनी, तर निफ्टी १०.२० अंशांनी घसरला. युरोपला भेडसावत असलेली ऊर्जाविषयक चिंता, तसेच व्याजदरवाढीची भीती यामुळे आजही जागतिक शेअरबाजारांमध्ये संमिश्र वातावरण होते. चीनची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तेथील प्रशासनाने उपाय योजल्यामुळे चिनी शेअरबाजार आज नफ्यात होते. मात्र, सकाळी नफ्यात असलेले भारतीय शेअरबाजार नंतर तोट्यात गेले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५९,१९६.९९ अंशांवर, तर निफ्टी १७,६५५.६० अंशांवर स्थिरावला. कोणत्याही ठोस संकेतांअभावी आज शेअरबाजार विशिष्ठ भावपातळ्यांच्या दरम्यान फिरत राहिले. जागतिक बाजारपेठांमध्ये साखरेची टंचाई झाल्याने केंद्र सरकार पुढील महिन्यापासून निर्यातीला संमती देईल, या आशेवर साखरनिर्मिती कारखान्यांच्या शेअरचे भाव वाढले. तर रबराचे भाव पडल्याने टायरनिर्मिती कंपन्यांचा नफा वाढण्याच्या अपेक्षेत त्यांच्या शेअरचे भाव वाढले.

रुपया दोन पैसे पडला
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आज दोन पैसे घसरून ७९.८० रुपयांवर स्थिरावला. अमेरिकी बाजारपेठा बंद असल्याने आज चलनबाजारात फारशी उलथापालथ झाली नाही. रुपया ७९.८० वरच उघडला व तो दिवसभर ७९.७३ ते ७९.९१ या भावपातळ्यांदरम्यान फिरत होता. अखेरीस तो कालच्या तुलनेत दोन पैसे घसरून ७९.८० वर बंद झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95939 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..