स्थानकांवर रेलनीलचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानकांवर रेलनीलचा तुटवडा
स्थानकांवर रेलनीलचा तुटवडा

स्थानकांवर रेलनीलचा तुटवडा

sakal_logo
By

स्थानकांवर ‘रेलनील’चा तुटवडा
मुंबई : सतत वीजपुरठा खंडित होत असल्याने ‘रेलनील’च्या बाटल्यांचा मोठा तुटवटा जाणवत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी खासगी कंपनीचा पाणीपुरवठा करण्याचे पत्र रेल्वे स्थानकावरील स्टॉलधारकांना इंडियन रेल्वे टुरिझम कॉपोरेशन (आयआरसीटीसी) दिले आहे. त्यामुळे ‘आरसीटीसी’च्या कारभारावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत दररोज उपनगरीय लोकल सेवांमधून ७५ लाख; तर लांब पल्ल्याच्या गाड्यांनीसुद्धा लाखो प्रवासी प्रवास करत असतात. या प्रचंड संख्येच्या रेल्वे प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी रेल्वेने पाणपोयांची व्यवस्था असली, तरी अनेक स्थानकांत त्या बंद पडलेल्या असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आणि किफायतशीर दरात पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून ‘आयआरसीटीसी’ने ‘रेलनील’ बॉटलचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करू दिला होता. त्यापाठोपाठ वॉटर व्हेंडिंग मशिनसुद्धा सुरू केली होती. मात्र वॉटर व्हेंडिंग मशिन गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96488 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..