शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाकडे दुर्लक्षच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाकडे दुर्लक्षच
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाकडे दुर्लक्षच

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाकडे दुर्लक्षच

sakal_logo
By

स्कुल बसची नियमांपासून फारकत
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कूल बसबाबत सरकारची काटेकोर नियमावली आहे; परंतु मुंबईत तिची कठोर अंमलबजावणीच होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ट्रॅव्हल्स, ट्रॅव्हलर, शेअर रिक्षा आणि टॅक्सींमधून शालेय विद्यार्थ्यांची सर्रास वाहतूक केली जात असून त्याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अशा वाहनांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही सुविधा नसल्याने दुर्घटनेचा धोका व्यक्त होत आहे. आजही सर्रास प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून विद्यार्थ्यांची ये-जा केली जात आहे. याआधीही अशा वाहनांना आगी लागणे किंवा विद्यार्थी घरी उशिरा पोहचण्यासारखे प्रकार घडले आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे. अशा वाहनांवर परिवहन विभागाकडून नियमित कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात असतानाही असे प्रकार कमी झालेले नाहीत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96739 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..