२५०० कोटींच्या ड्रग्सप्रकरणी कारखाना मालक अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२५०० कोटींच्या ड्रग्सप्रकरणी कारखाना मालक अटकेत
२५०० कोटींच्या ड्रग्सप्रकरणी कारखाना मालक अटकेत

२५०० कोटींच्या ड्रग्सप्रकरणी कारखाना मालक अटकेत

sakal_logo
By

अमली पदार्थ कारखानादरास अटक
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ बनवणाऱ्या कारखाना मालकाला २५०० कोटींच्या ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. जितेंद्र व्होरा त्या संशयिताचे नाव असून, तो नमाऊ केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये पकडलेल्या २५०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील २४० केमिकल कंपन्या अँटीनार्कोटिक्स सेलच्या रडारवर आहेत. एका मोठ्या केमिकल कंपनीच्या संचालकाला या प्रकरणात अटक केल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने या कंपन्यांची माहिती सर्व पोलिस ठाण्यांसोबत जाहीर केली आहे. व्होरा रसायनशास्त्राची पदवीधर असून त्याला ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव आहे. या प्रकरणात व्होराला अजून एक मुख्य संशयित प्रेम प्रकाश सिंग याच्याशी संगनमत केल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97090 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..