औद्योगिक क्षेत्रात रात्री टँकर बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगिक क्षेत्रात रात्री टँकर बंदी
औद्योगिक क्षेत्रात रात्री टँकर बंदी

औद्योगिक क्षेत्रात रात्री टँकर बंदी

sakal_logo
By

औद्योगिक क्षेत्रात रात्री टँकर बंदी
ठाणे ः रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत रासायनिक कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषणकारी रसायने नदीपात्रात सोडली जात आहेत. त्याला चाप लावण्यासाठी डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरासह औद्यागिक क्षेत्रांमध्ये सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी हा आदेश जारी केला आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये रात्री टँकरच्या माध्यमातून धोकादायक रसायने वाहून नदीपात्रात सोडली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नदी प्रदूषित होऊन मानवी आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97100 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..