वन रूपी क्लिनिकमुळे रेल्वे प्रवासी तंदुरुस्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन रूपी क्लिनिकमुळे रेल्वे प्रवासी तंदुरुस्त!
वन रूपी क्लिनिकमुळे रेल्वे प्रवासी तंदुरुस्त!

वन रूपी क्लिनिकमुळे रेल्वे प्रवासी तंदुरुस्त!

sakal_logo
By

वन रूपी क्लिनिक सेवेला प्रतिसाद
मुंबई : रेल्वे प्रवाशांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील काही महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकांत सुरू करण्यात आलेल्या वन रूपी क्लिनिक सेवेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत लाखो प्रवाशांनी वन रूपी क्लिनिक सेवेचा लाभ घेत उपचार मिळवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रोत्सवापासून लोअर परळ, खार रोड, भाईंदर, सफाळे व डहाणू अशा पाच स्थानकांत वन रूपी क्लिनिकच्‍या नव्या शाखा सुरू होत आहेत. आतापर्यंत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर जवळपास २० स्थानकांवर अशी सुविधा सुरू आहे. मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकात १० मे २०१७ रोजी वन रूपी क्लिनिकची सेवा सुरू झाली. त्यानंतर अनेक स्थानकांवर त्याचा विस्तार झाला. मुंबईत दिवसाला एक ते दीड लाख प्रवासी लोकल प्रवास करतात. आपत्कालीन स्थितीत त्यांना कमी किमतीत उपचार मिळावेत हा वन रूपी क्लिनिकचा उद्देश आहे. अपघातग्रस्त प्रवासी, गर्भवती किंवा ‘गोल्डन अवर’मध्ये लागणारे उपचार अशा सर्व सुविधा एकाच छताखाली तात्काळ उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांमध्ये वन रूपी क्लिनिकबाबतची विश्वासार्हता वाढली आहे.