दुर्मिळ प्रजातीचे ६००हून अधिक प्राणी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्मिळ प्रजातीचे ६००हून अधिक प्राणी जप्त
दुर्मिळ प्रजातीचे ६००हून अधिक प्राणी जप्त

दुर्मिळ प्रजातीचे ६००हून अधिक प्राणी जप्त

sakal_logo
By

विमानतळावर प्राण्यांची तस्करी रोखली
मुंबई : मुंबई विमानतळावर विविध दुर्मिळ प्रजातींचे साप, कासव, सरडे आणि इतर असे ६०० हून अधिक प्राणी तस्करी करून घेऊन जात असताना जप्त करण्यात आले. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई झोनल युनिटने ही कारवाई केली आहे. एअर कार्गो कॉम्प्लेक्स मुंबई येथून एका मालामध्ये अनेक विदेशी प्रजातींचे ६६५ प्राणी डीआरआयने जप्त केले. हे परदेशातून अवैधरीत्या भारतात आणले जात होते. याप्रकरणी दोन तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. जप्त केलेले काही प्राणी मृतावस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजारात या प्राण्यांची किंमत २.९८ कोटी रुपये आहे.