लोहमार्ग पोलिसांनी २५४ प्रवाशांचे प्राण वाचवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोहमार्ग पोलिसांनी २५४ प्रवाशांचे प्राण वाचवले
लोहमार्ग पोलिसांनी २५४ प्रवाशांचे प्राण वाचवले

लोहमार्ग पोलिसांनी २५४ प्रवाशांचे प्राण वाचवले

sakal_logo
By

पोलिसांनी वाचवले २५४ प्रवाशांचे प्राण
मुंबई : मुंबई विभागातील लोहमार्ग पोलिसांनी तीन वर्षांत स्वतःचा जीव धोक्यात घालून २५० पेक्षा जास्त प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे जानेवारी ते सप्टेंबर २०२२ दरम्यानच्या कालावधीत रेल्वे पोलिसांनी १३६ जणांना जीवदान दिले. धावती लोकल पकडताना किंवा दारावर उभे राहून प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांचे अपघात होतात. त्यात अनेकांचा मृत्यू होतो. काही प्रवाशांना अपंगत्व येते. गेल्या काही वर्षांपासून लोकलसमोर येऊन आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्याला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी स्थानकांवर गस्त वाढवली आहे. परिणामी, तीन वर्षांत लोहमार्ग पोलिसांना तब्बल २५४ प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.