पूर्व उपनगरांत पुन्हा पाणी संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्व उपनगरांत पुन्हा पाणी संकट
पूर्व उपनगरांत पुन्हा पाणी संकट

पूर्व उपनगरांत पुन्हा पाणी संकट

sakal_logo
By

भांडूपमध्ये जलवाहिनी फुटली
भांडुप ः भांडुप परिसरात जिजामाता शाळेजवळ संभाजी चौकात जलवाहिनी बुधवारी पुन्हा फुटल्याने रहिवाशांचे आज पाण्याअभावी हाल झाले. भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर आदी पूर्व उपनगरांत पुन्हा पाणी संकट असून परिसरातील पुरवठा दुसऱ्या दिवशीही विस्कळित होता. महापालिकेने ९०० एमएम व्यासाच्या जलवाहिनीची तत्काळ दुरुस्ती सुरू केली असून पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी ४८ तासांपासून मेहनत घेत आहेत. लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याने दिली. मात्र, जुनी जलवाहिनी तातडीने बदला, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.