नेहरू तारांगण ते नेहरू सेंटरदरम्यान भुयारी मार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेहरू तारांगण ते नेहरू 
सेंटरदरम्यान भुयारी मार्ग
नेहरू तारांगण ते नेहरू सेंटरदरम्यान भुयारी मार्ग

नेहरू तारांगण ते नेहरू सेंटरदरम्यान भुयारी मार्ग

sakal_logo
By

नेहरू तारांगणापाशी भुयारी मार्ग होणार
मुंबई : वरळीतील नेहरू तारांगण ते नेहरू सेंटरपर्यंतचे अंतर पार करणे हे बरेच वेळखाऊ आणि खर्चिकही आहे; परंतु दोन्ही वास्तूंचा एकमेकांशी विज्ञानाच्या निमित्ताने संबंध आहे. या दोन्ही वास्तू जोडण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. डॉ. मोझेस रोड ते डॉ. ॲनी बेझंट मार्गावरील नेहरू सायन्स सेंटरजवळील नाल्यावरही पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. या दोन्ही योजनांसाठी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नेहरू तारांगण ते नेहरू सेंटरपर्यंतचा मार्ग हा वर्दळीचा आहे. येथील रस्ता ओलांडताना नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने २५ मीटर लांबीचा भुयारी मार्ग बांधण्याची योजना आखली आहे.