कोस्टल रोडच्या कामामुळे गिरगाव चौपाटीवर नो एंट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोस्टल रोडच्या कामामुळे गिरगाव चौपाटीवर नो एंट्री
कोस्टल रोडच्या कामामुळे गिरगाव चौपाटीवर नो एंट्री

कोस्टल रोडच्या कामामुळे गिरगाव चौपाटीवर नो एंट्री

sakal_logo
By

गिरगाव चौपाटी बंद राहणार
मुंबई : मुंबई दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना यापुढचे काही दिवस गिरगाव चौपाटीवर समुद्राच्या पाण्यात मौजमस्ती करण्याचा आनंद घेता येणार नाही. मुंबईत पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडचे काम गिरगाव चौपाटी परिसरात सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तिथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पुढचे काही दिवस गिरगाव चौपाटीचा परिसर प्रकल्पाच्या कामामुळे प्रतिबंधित क्षेत्र असणार आहे. त्याचा फटका स्थानिक पर्यटनाला बसणार असून सर्वसामान्यांनाही त्या परिसरात जाता येणार नाही. कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.