प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न
प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

उंच पाण्याच्या टाकीवरून
प्रेयसीला दिले ढकलून
मुंबई, ता. १७ : कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या प्रेयसीला १८ फूट उंच पाण्याच्या टाकीवरून ढकलून दिल्याचा प्रकार दहिसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमेय दरेकर याला अटक केली आहे. दरम्यान, प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी सांगितले, की दोघांची एकमेकांशी सुमारे दहा वर्षांपासून ओळख असून, ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि याचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्या दरम्यान, अमेयने प्रेयसीला टाकीवरून ढकलले.