घशात मासा अडकल्याने सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घशात मासा अडकल्याने 
सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
घशात मासा अडकल्याने सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

घशात मासा अडकल्याने सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

sakal_logo
By

सहा महिन्यांच्या बाळाचा
मासा घशात अडकून मृत्यू
अंबरनाथ, ता. २५ : शहरातील एका सहा महिन्यांच्या बाळाचा घशात मासा अडकून मृत्यू झाला. अंबरनाथच्या पूर्व भागातील उलन चाळ परिसरात सरफराज अन्सारी परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा शहबाज सहा महिन्यांचा मुलगा. तो गुरुवारी रात्री घराबाहेर इतर लहान मुलांसोबत होता. त्याला अचानक त्रास जाणवू लागला. इतर मुलांनी शहबाजच्या पालकांना याबाबत माहिती दिली. त्याला श्‍वास घेता येत नसल्याने तो रडत होता. तो गुदमरत असल्याचे पाहून पालकांना काय होतेय, हे कळत नव्हते. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर उल्हासनगरमधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालय नेले; मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी शहबाजला तपासले असता त्याच्या घशात मासा अडकून श्वास रोखला होता. सहा महिन्यांचे बाळ डोळ्यांदेखत दगावल्याचे पाहून त्याच्या आईने एकच टाहो फोडला होता.