निर्देशांकांमध्ये मोठी घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांकांमध्ये मोठी घसरण
निर्देशांकांमध्ये मोठी घसरण

निर्देशांकांमध्ये मोठी घसरण

sakal_logo
By

निर्देशांकांमध्ये मोठी घसरण
मुंबई, ता. १५ : अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदर वाढ करताना भविष्याबाबतही प्रतिकूल संकेत दिल्याने शेअर बाजारात निराशा आणि घबराट पसरून भारतीय शेअर बाजार निर्देशांक सव्वा ते दीड टक्क्याच्या आसपास घसरले. सेन्सेक्स ८७८.८८ अंश, तर निफ्टी २४५.४० घसरला.
अमेरिकी फेडची अर्धा टक्का दरवाढ अपेक्षितच होती. मात्र, अमेरिकी चलनवाढ कमी झाल्यामुळे भविष्यात त्यांचा व्याजदर वाढीचा वेग कमी होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती; पण भविष्यातही व्याजदर वाढ होईल, असा इशारा ‘फेड’तर्फे आज देण्यात आल्यामुळे गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाला व सर्वच जागतिक शेअर बाजारांमध्ये विक्री झाली. त्याचेच अनुकरण करीत भारतीय शेअर बाजारही आज घसरले. दिवस अखेरीस सेन्सेक्स ६१,७९९.०३ अंशांवर, तर निफ्टी १८,४१४.९० अंशांवर स्थिरावला.
आज जवळपास सर्वच क्षेत्रे तोटा दाखवत होती. अमेरिकी फेडच्या संकेतांमधून भविष्यात मंदीची चिन्हे दिसत असल्यामुळे आयटी क्षेत्राच्या शेअरमध्ये पुन्हा जोरदार विक्री झाली व त्या क्षेत्राला मोठा फटका बसला. आज आयटी, बँका, धातू निर्मिती क्षेत्र, बांधकाम व्यवसाय आदी सर्वच क्षेत्रांच्या शेअरमध्ये मोठी विक्री झाली. त्यातच चीनमधील औद्योगिक उत्पादन आणि किरकोळ विक्रीची आकडेवारी खराब आल्याने जागतिक नकारात्मक वातावरणात भर पडली. त्यामुळे आज सर्वांनीच नफा वसुली करण्यावर भर दिला.

हे शेअर्स पडले
आज सेन्सेक्सच्या प्रमुख तीस शेअरपैकी फक्त सन फार्मा आणि एनटीपीसी या शेअरचे भाव किरकोळ वाढले. त्याखेरीज अन्य सर्व म्हणजे २८ शेअरचे भाव घसरले. त्यातही इन्फोसिस, टेक महिंद्रा, टायटन या शेअरचे भाव अडीच ते चार टक्के घसरले. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, टीसीएस, नेस्ले, स्टेट बँक या शेअरचे भाव पावणेदोन ते दोन टक्के घसरले. बजाज फिन्सर्व्ह, डॉक्टर रेड्डीज लॅब, एचसीएल टेक, आयटीसी, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, इंडसइंड बँक या शेअरचे भावही घसरले.