पालखी नृत्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार

पालखी नृत्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार

पालखी नृत्य संस्कृती
आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ
आमदार आव्हाड; स्पर्धेत करंबेळे संघ अव्वल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : गल्लीत बालगोपाळांपुरता मर्यादित असलेला दहीहंडीचा सण आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. आता कोकणातील पालखी नृत्याचा उत्‍सव ठाण्यात साजरा करीत आहोत. हा सण आणि ही पालखी नृत्याची संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.
कळवा येथील खारलँड मैदानावर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या शिमगोत्सवात डॉ. आव्हाड यांनी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नृत्य केले. याप्रसंगी डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, की कोकणी माणूस हा संस्कृती आणि गावप्रिय असणारा माणूस आहे. मुंबईला घडविण्यात कोकणी माणसाचा मोठा वाटा आहे. सलग चार दिवसांचा कोकण महोत्सव आयोजित करून कोकणातील सर्वच तालुक्यांतील महत्त्‍वाच्या गावांतील पालख्या या स्पर्धेत सामावून घेऊ. ही स्पर्धा अधिक भव्य दिव्य करून दहीहंडीप्रमाणेच पालखी नाचवण्याची ही संस्कृतीदेखील जगभर पोहचवू, असे आश्वासनही डॉ. आव्हाड यांनी दिले.

संगमेश्वरचा गांगोबा करंबेळे संघ अव्‍वल
पालखी नृत्य स्पर्धेत सुमारे अकरा संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत दोन लाख १० हजार रुपयांचे पहिले पारितोषिक संगमेश्वरच्या गांगोबा करंबेळे संघाने पटकावले. दुसरे एक लाख ५१ हजारांचे पारितोषिक राजापूरच्या रामेश्वर चिचवाडी संघाने, तिसरे एक लाख १ हजाराचे पारितोषिक वाघजाई मानोबा पालखी नृत्य पथक माखजन, संगमेश्वर यांनी पटकाविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com