बहिणाबाई चौधरी पुरस्कार वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहिणाबाई चौधरी पुरस्कार वितरण
बहिणाबाई चौधरी पुरस्कार वितरण

बहिणाबाई चौधरी पुरस्कार वितरण

sakal_logo
By

झारापच्या भगीरथ प्रतिष्ठानला
बहिणाबाई चौधरी पुरस्कार
जळगाव, ता. ६ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दिला जाणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (ता. ७) आहे.
राज्यस्तरावर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानला पुरस्कार जाहीर झाला आहे. कोकणासारख्या दुर्गम भागात ही संस्था बायोगॅस, कुक्कटपालन, श्वेतसंवाद आदी क्षेत्रांत सामाजिक परिवर्तनाचे काम करीत आहे. त्यामुळे संस्थेला निवड समितीने पुरस्कार जाहीर केला असून, ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू प्रा. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते उद्या विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात पुरस्कार वितरण होणार आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी आहेत. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे उपस्थित असतील. सकाळी अकराला कार्यक्रम होईल. याच समारंभात २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांतील विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालये, प्राचार्य, शिक्षक व अधिकारी-कर्मचारी पुरस्कार, तसेच संशोधन पुरस्कारही दिले जाणार आहेत. ही माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली आहे.