आकाश बायज्यूज बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकाश बायज्यूज बातमी
आकाश बायज्यूज बातमी

आकाश बायज्यूज बातमी

sakal_logo
By

सूचना ः जाहिरात विभागाकडून आलेली ही बातमी सर्व आवृत्त्यांसाठी आवश्यक आहे.
.................
‘आकाश बायज्यूज’तर्फे
गरजू विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती
दोन हजार मुलींना मिळणार लाभ
पुणे, ता. १० : ‘आकाश बायज्यूज’तर्फे गरजू विद्यार्थिनींसाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत सातवी ते बारावीच्या गरजू विद्यार्थिनींपैकी दोन हजार विद्यार्थिनींना मोफत नीट व जेईई प्रशिक्षण व शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत. ‘आकाश बायज्यूज नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम-२०२२’ला (अँथे २०२२) बसलेल्यांपैकी विशिष्ट निकषांतील विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीच्या रूपाने मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळेल. शिष्यवृत्तींबरोबरच पाच विद्यार्थांना पालकांसह नासाच्या मोफत सहलीची घोषणाही करण्यात आली आहे.
‘आकाश बायज्यूज’चे अध्यक्ष जे. सी. चौधरी, व्यवस्थापकीय संचालक आकाश चौधरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक माहेश्वरी आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. आर्थिक दुर्बल कुटुंब, एक मुलगी असलेले कुटुंब, किंवा एकच पालक (आई) असलेले कुटुंब आदी निकषांत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची छाननी करण्यात येऊन त्यांना ‘अँथे २०२२’ला बसवले जाईल आणि त्यातील सर्वांत जास्त गुण मिळवणाऱ्या दोन हजार जणांना शिष्यवृत्ती मिळेल. गरजूंची निवड करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांसोबत भागिदारी केली जाणार आहे.
‘अँथे’ ही परीक्षा एक तासाची आहे. तिला सर्व विद्यार्थ्यांना बसता येणार आहे. ६ ते १३ नोव्हेंबर या काळात सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत ऑनलाइन पद्धतीने, तर ऑफलाइन परीक्षा देणाऱ्यांसाठी ‘आकाश’च्या २८५पेक्षा जास्त केंद्रांवर सकाळी साडेदहा ते साडेअकरा आणि दुपारी चार ते पाच या शिफ्ट्समध्ये परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थी पाहिजे ती पद्धत निवडू शकतात. अधिक माहिती anthe.aakash.ac.in या संकेतस्थळावर मिळेल, असे कळवण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88826 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..