कृषी क्षेत्राला उद्योजक देणारा ‘कृषी व्यवसाय व्यवस्थापन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी क्षेत्राला उद्योजक देणारा ‘कृषी व्यवसाय व्यवस्थापन’
कृषी क्षेत्राला उद्योजक देणारा ‘कृषी व्यवसाय व्यवस्थापन’

कृषी क्षेत्राला उद्योजक देणारा ‘कृषी व्यवसाय व्यवस्थापन’

sakal_logo
By

कृषी क्षेत्राला उद्योजक देणारा
‘कृषी व्यवसाय व्यवस्थापन’

देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. जीडीपी-विकासदरात याचा १९.९ टक्के वाटा आहे. तसेच २०२१-२२ या वर्षी कृषी क्षेत्रातील सकल मूल्यवर्धनात ३.९ टक्क्यांची दमदार वाढ झाली आहे. हे क्षेत्र देशातील विभिन्न क्षेत्रातील रॉ-मटेरिअलच्या पुरवठ्यातही भरीव योगदान देते. वर्तमानकाळात कृषी क्षेत्र फक्त खाद्य उत्पादनापर्यंत मर्यादित राहिले नसून बिझनेसच्या क्षेत्रातही ते महत्त्वाची भूमिका निभावत आहे. कृषी आधारित उत्पादनांचे उत्पादन वाढविण्यासह या क्षेत्रात करिअरचे नवे पर्याय समोर येत आहेत. कृषी व्यवसाय उद्योगाच्या क्षेत्रात रोजगाराच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

कृषी क्षेत्राला रोजगारक्षम युवक पुरवण्यासाठी उपलब्ध अभ्यासक्रमांमधील ‘अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट’ हा एक विशेष अभ्यासक्रम आहे, जो कृषी उत्पादनाच्या बिझनेस आधारित पैलूंवर आणि कृषीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर लक्ष केंद्रित करतो. हा प्रोग्रॅम कृषी क्षेत्रातील आंत्रप्रेन्योर आणि बिझनेस लीडर तयार करण्याचे काम करतो.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा अभ्यासक्रम इंडस्ट्रीच्या सहभागाने व सहकार्याने तयार केला आहे. CAMP ही अभिनव पद्धत या पदव्युत्तर प्रोग्रॅमची विशेष बाब आहे. CAMP हे एक इंडस्ट्री सेंट्रिक टेक्निकल मॉडेल आहे. ज्यात इंडस्ट्री रिलेटेड ‘कंटेंट’ असणारा अभ्यासक्रम, इंडस्ट्रीमधील चालू परिस्थितीतील असाईनमेंटना सामोरे जाणारी संधी, इंडस्ट्री एक्स्पर्टद्वारे होणारे ‘मास्टर क्लास’ आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यास प्रत्यक्ष इंडस्ट्रीसोबत प्रोजेक्ट, अशी प्रॅक्टिकल प्रक्रिया राबवली जाते. याद्वारे उमेदवारांचे संपूर्ण व्यावहारिक प्रशिक्षण होते.

‘लर्न अँड काँट्रिब्यूट इनिशिएटिव्ह इन इंडस्ट्री’ (एलसीआय) म्हणजे विद्यार्थ्यांना थिअरी प्रशिक्षणानंतर थेट ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीजमध्ये सहा महिने फिल्डवर काम करण्याचा अनुभव देणारे मॉड्यूल. या मॉड्यूलला सामोरे जाताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास येण्यासाठी सुरुवातीचे थिअरी वर्ग वरील ‘CAMP’ मॉडेलनुसार घेतले जातात. कृषी क्षेत्रातील ‘यंग टॅलेंट’ आता कागदी पदव्यांद्वारे मिळणार नसून ते याप्रमाणे प्रॅक्टिकल ॲप्रोच देणाऱ्या ‘एबीएम’सारख्या प्रोग्रॅममधून मिळणार आहे हे निश्चित.

PNE22S84384-1
अधिक माहितीसाठी क्यूआर कोड स्कॅन करा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89799 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..