कृषी क्षेत्रात स्टार्टअप, नोकरीच्या संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी क्षेत्रात स्टार्टअप, नोकरीच्या संधी
कृषी क्षेत्रात स्टार्टअप, नोकरीच्या संधी

कृषी क्षेत्रात स्टार्टअप, नोकरीच्या संधी

sakal_logo
By

कृषी क्षेत्रात स्टार्टअप, नोकरीच्या संधी
पुणे, ता. २० : आपण बीए, बीकॉम, बीएस्सी, बीई, बीटेक, बीबीए, बीएस्सी ॲग्री, बीसीए क्षेत्रात पदवीधर झालेले असाल आणि पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी योग्य अभ्यासक्रमाच्या शोधात असाल तर ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे कृषी क्षेत्रात स्टार्टअप तसेच नोकरीच्या संधी देणाऱ्या अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करणारा मोफत सेमिनार २७ ऑगस्टला पुण्यात सकाळनगर येथे आयोजिला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये स्वतःचा स्टार्टअप करायचा आहे वा चांगल्या पगाराचा जॉब मिळवायचा आहे; तसेच पिढीजात चालत आलेला शेतीनिगडीत व्यवसाय जसे की डेअरी, पोल्ट्री इ. वाढवायचा आहे अशांसाठी ‘एसआयआयएलसी’तर्फे एक वर्षाचा ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ हा इंडस्ट्री तज्ज्ञांकडून आखलेला अभ्यासक्रम चालविला जातो. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीचे परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते.
सेमिनारमध्ये या कोर्सच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, वेगळेपण, कालावधी, विषय तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कुठे, कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात या विषयी मार्गदर्शन होईल. सेमिनार २१ ते २५ वर्षे पूर्ण वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असून मर्यादित जागांसाठी असल्याने आगाऊ नावनोंदणी आवश्यक आहे.

कोर्सची वैशिष्ट्ये.....
- एक वर्ष कालावधीचा एकमेव अद्वितीय अभ्यासक्रम
- सहा महिने क्लासरूम, सहा महिने इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप
- शिका आणि योगदान द्या अंतर्गत इंडस्ट्रींसोबत कामाचा अनुभव
- कोर्सनंतर नोकरी, स्टार्टअपसाठी सहकार्य


सेमिनारविषयी.....
कधी ः शनिवार, २७ ऑगस्ट २०२२
केव्हा ः दुपारी ११.३० ते २ वाजेपर्यंत
कुठे ः सकाळ मीडिया सेंटर, चौथा मजला, सकाळनगर, गेट नं. १, बाणेर रोड, पुणे
अधिक माहितीसाठी ः www.siilc.edu.in/abm
नावनोंदणीसाठी संपर्क ः ७२१९६११३०६, ९८८१०९९७५७