पाटण कोयनापाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटण कोयनापाऊस
पाटण कोयनापाऊस

पाटण कोयनापाऊस

sakal_logo
By

कोयनेतून तीस हजार क्युसेक विसर्ग
पाटण, ता. २० ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला असून, धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा ९७.०७ टीएमसी झाला असून, पाणीसाठा नियंत्रणासाठी कोयना धरण व्यवस्थापनाने आज सकाळी दहा वाजता सलग सात दिवस तीन फुटांवर स्थिर ठेवण्यात आलेले सहा वक्र दरवाजे साडेचार फुटांवर नेले आहेत. त्यामुळे सहा वक्र दरवाजांतून २९ हजार ९०० व पायथा वीजगृहातून २१०० असा एकूण ३२ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्याने कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.
कोयना धरण व्यवस्थापनाने ११ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू केला होता. पावसाचा जोर पुन्हा वाढला आणि १२ ऑगस्टला सकाळी दहाला धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलले. १४ ऑगस्टला दरवाजे दीडवरून तीन फुटांवर उचलले गेले. पावसाचा जोर कमी झाल्यावर दरवाजे पुन्हा तीन फुटांवर स्थिर केले. धरणाचा पाणीसाठा ९७.१८ टीएमसीपर्यंत पोचला होता; मात्र, आवक वाढल्याने आज सकाळी दहापासून साडेचार फुटांवर उचलले आहेत. धरणात २३ हजार ८१४ क्युसेक आवक होत आहे.