देशातील सर्वांत मोठी आयुर्विमा कंपनी एलआयसीचे ६७व्या वर्षात पदार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशातील सर्वांत मोठी आयुर्विमा कंपनी एलआयसीचे ६७व्या वर्षात पदार्पण
देशातील सर्वांत मोठी आयुर्विमा कंपनी एलआयसीचे ६७व्या वर्षात पदार्पण

देशातील सर्वांत मोठी आयुर्विमा कंपनी एलआयसीचे ६७व्या वर्षात पदार्पण

sakal_logo
By

एलआयसीचे ६७ व्या वर्षात पदार्पण
मुंबई, ता. १ ः ‘योगक्षेमम् वहम्यहम्’ हे ब्रीदवाक्य असणारी देशातील सर्वांत मोठी आयुर्विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी आज ६७ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. आयुर्विमा म्हणजे एलआयसी असे समीकरण नागरिकांच्या मनात तयार करणाऱ्या एलआयसीने १९५६ मध्ये केवळ पाच कोटी रुपयांच्या भांडवलावर सुरुवात केली होती. देशातील सर्वसामान्य लोकांपर्यंत परवडणाऱ्या किमतीत विमा सुरक्षा कवच पोहोचवण्यात तसेच जनजागृती करण्यात तिचे अन्यन्नसाधारण योगदान असून ती विमा क्षेत्रातील विश्वासार्हतेचे प्रतीक मानली जाते.
गेल्या दोन दशकांपासून विमा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले झाल्यानंतरही एलआयसीच या क्षेत्रातील अव्वल कंपनी राहिली आहे. बाजारपेठेतील तिचा हिस्सा सर्वांत जास्त आहे. पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नाच्या आधारावर ६३.२५ टक्के तर पॉलिसींच्या संख्येच्या आधारावर ७४.६२ टक्के हिस्सा एलआयसीचा आहे. आज एलआयसीकडे ३७,३५,७५९ कोटी रुपयांच्या निधीसह ४२,३०,६१६ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. एलआयसीने २०२१-२०२२ या वर्षात २.१७ कोटी नवीन पॉलिसी विकल्या तर पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नात वार्षिक ७.९२ टक्के वाढ नोंदवत ३१ मार्च २०२२ पर्यंत १.९८ लाखकोटींचे उत्पन्न मिळवले. निवृत्तीवेतन योजना आणि सुपरअॅन्युएशन व्यवसायाने सलग तीन वर्षे सलग एक लाखकोटींचा टप्पा ओलांडला आहे. चालू वर्षातही एलआयसीने पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नाच्या आधारावर बाजारपेठेत ६४.९६ टक्के हिस्सा मिळवला आहे. विविध वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या ३३ वैविध्यपूर्ण योजना, जीवन साक्ष मोबाइल अॅपसह विविध डिजिटल सुविधा, आठ परिमंडळ कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा कार्यालये, ४४९०० प्रीमियम पॉइंट्स, एक लाखांहून अधिक कर्मचारी, १३.२६ लाख एजंट यासह ७४ बँकाशी भागीदारी असा तिचा विस्तार आहे. गोल्डन ज्युबिली फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या एलआयसीने विम्याव्यतिरिक्त अन्य आर्थिक सेवा क्षेत्रांमध्येही प्रवेश केला असून उत्तम कामगिरीच्या जोरावर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96135 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..