डेअरी, फूड प्रोसेसिंग उद्योगांतील संधींविषयी विनामूल्य वेबिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेअरी, फूड प्रोसेसिंग उद्योगांतील 
संधींविषयी विनामूल्य वेबिनार
डेअरी, फूड प्रोसेसिंग उद्योगांतील संधींविषयी विनामूल्य वेबिनार

डेअरी, फूड प्रोसेसिंग उद्योगांतील संधींविषयी विनामूल्य वेबिनार

sakal_logo
By

डेअरी, फूड प्रोसेसिंगमधील
करिअसाठी विनामूल्य वेबिनार

पुणे, ता. ८ : ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्नित शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे डेअरी व फूड प्रोसेसिंग उद्योगांतील करिअर संधी व स्टार्ट-अप सुरू करण्यासंबंधी मार्गदर्शन करणारे विनामूल्य वेबिनारचे आयोजन केले आहे.
डेअरी उद्योगाविषयी फलटण येथील ‘गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स’चे सरव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत. गायकवाड यांचा डेअरी विषयात सुमारे २५ वर्षांचा अनुभव आहे, डेअरी बिझनेसमधील विविध प्रकारचे यशस्वी उद्योजक घडविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. हे वेबिनार शनिवारी (ता. १०) दुपारी चार वाजता आयोजित केले आहे.
फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीविषयी ‘एस व्ही ग्रुप ऑफ कंपनीज’चे समूह संचालक विकास दांगट हे मार्गदर्शन करणार आहेत. दांगट हे ॲग्री प्युअर नॅचरल फुड्स प्रा.लि.चे यशस्वी उद्योजक आहेत. हे वेबिनार रविवारी (ता. ११) सकाळी अकरा वाजता आयोजित केले आहे. वेबिनारसाठी नावनोंदणी अनिवार्य असून, पदवीधर २१ ते २५ वयोगटांतील युवक-युवतींनी यासाठी नावनोंदणी करावी.
नावनोंदणीसाठी संपर्क : ९८८१०९९७५७, ७२१९६११३०६

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98298 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..