ॲग्रिकल्चर एक्स्पोर्ट उद्योगातील संधींविषयी विनामूल्य वेबिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲग्रिकल्चर एक्स्पोर्ट उद्योगातील संधींविषयी विनामूल्य वेबिनार
ॲग्रिकल्चर एक्स्पोर्ट उद्योगातील संधींविषयी विनामूल्य वेबिनार

ॲग्रिकल्चर एक्स्पोर्ट उद्योगातील संधींविषयी विनामूल्य वेबिनार

sakal_logo
By

सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

ॲग्रिकल्चर एक्स्पोर्ट उद्योगातील
संधींविषयी विनामूल्य वेबिनार

पुणे, ता. १० : भारत हा जगातील सर्वांत मोठा कृषी उत्पादने निर्यात करणारा देश आहे. फळे आणि भाजीपाल्याच्या उत्पादनात आणि निर्यातीत भारत अग्रेसर आहे. कृषी आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यातीमध्ये २०२१-२२ या वर्षात भारताने ४९.६ अब्ज डॉलर इतक्या रकमेची निर्यात नोंदवली. २०२०-२१ मध्ये ही निर्यात ४१.३ अब्ज डॉलर व २०१९-२० मध्ये ३७.३ अब्ज डॉलर इतकी होती. व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे समुद्री पोर्ट व आंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध असल्याने कृषिमालाच्या निर्यातीस भारतात मोठा वाव आहे. निर्यातीत होणारी ही वाढ लक्षात घेता निर्यात क्षेत्रात रोजगाराच्या व स्टार्टअप सुरू करण्याच्या अनेक संधी निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर ॲग्रिकल्चर एक्स्पोर्ट उद्योगातील करिअर संधी व स्टार्टअप सुरू करण्यासंबंधी मार्गदर्शन करणारा विनामूल्य वेबिनार मंगळवारी (ता. १३) दुपारी ४ वाजता आयोजित केला आहे. यामध्ये ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’चे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. सह्याद्री ही द्राक्ष निर्यातीमधील भारतातील अग्रगण्य कंपनी असून, भाजीपाला व फळप्रक्रिया उद्योगातही तिने यशस्वी वाटचाल केली आहे. यामध्ये २१ ते २५ वयोगटातील पदवीधर युवक-युवतींनी नावनोंदणी करावी.
संपर्क : ९८८१०९९७५७, ७२१९६११३०६.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98783 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..