वर्षपूर्तीनिमित्त ‘टायगून’ तीन विशेष रंगात उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षपूर्तीनिमित्त ‘टायगून’ तीन विशेष रंगात उपलब्ध
वर्षपूर्तीनिमित्त ‘टायगून’ तीन विशेष रंगात उपलब्ध

वर्षपूर्तीनिमित्त ‘टायगून’ तीन विशेष रंगात उपलब्ध

sakal_logo
By

वर्षपूर्तीनिमित्त ‘टायगुन’
तीन विशेष रंगात उपलब्ध

रायझिंग ब्ल्यू, करकुमा पिवळा, चेरी रेड आवृत्ती दाखल

मुंबई, ता. ४ ः जर्मन वाहन उत्पादक कंपनी फोक्सवॅगनने आपली लोकप्रिय एसयुव्ही ‘टायगुन’ला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायझिंग ब्ल्यू, करकुमा पिवळा, चेरी रेड अशा तीन नव्या रंगात ही गाडी दाखल केली आहे. या नव्या आवृत्तीत फॉग लॅम्प्स, बॉडी कलर्ड डोअर गार्निश, ब्लॅक सी पिलर ग्राफीक्स, ब्लॅक रुफ फॉइल, डोअर एज प्रोटेक्टर, ओव्हीआरएम कॅप्स आदी ११ खास वैशिष्ट्ये आहेत.
गेल्या वर्षी ही एसयुव्ही श्रेणीतील गाडी दाखल करण्यात आली. एका वर्षात ४० हजार टायगुनची नोंदणी झाली असून, पुरवठ्यातील अडथळ्यानंतरही २२ हजार ग्राहकांना ‘टायगुन’ सुपूर्द करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ‘टीएसआय’ तंत्रज्ञानयुक्त ही गाडी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, सहा एअरबॅग्ज, मल्टी-कॉलिजन ब्रेक्स, रिव्हर्स कॅमेरा, टायर प्रेशर डिफ्लेशन प्रणाली, सीट बेल्टस आदी ४०पेक्षा अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह तीन अॅडजस्टेबल हेडरेस्ट आदी वैशिष्ट्यांनीही सुसज्ज आहे. एक लिटर क्षमतेचे टीएसआय इंजिन सिक्स स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ऑटोमॅटिक आणि १.५ लिटर क्षमतेचे टीएसआय इव्हो इंजिन सिक्स स्पीड मॅन्युअल आणि सेव्हन स्पीड डीएसजी ट्रान्समिशन अशा पर्यायांमध्ये ही एसयुव्ही उपलब्ध आहे.
‘टायगुन’ची नवी आवृत्ती दाखल करण्यात आल्याबद्दल फोक्सवॅगन इंडियाच्या प्रवासी वाहन विभागाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता म्हणाले, ‘एसयुव्ही श्रेणीत तायगुनने भारतात लोकप्रियतेचे शिखर गाठले असून जगातही ती तिसऱ्या क्रमांकाची लोकप्रिय एसयुव्ही ठरली आहे. फोक्सवॅगनच्या अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक असलेली ही कार सुरक्षितता, गुणवत्ता, ड्रायव्हिंगचा सुखद अनुभव देण्यात यशस्वी ठरली आहे.’