किया इंडियाची ‘र्इव्ही ६’ भारतात लाँच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किया इंडियाची ‘र्इव्ही ६’ भारतात लाँच
किया इंडियाची ‘र्इव्ही ६’ भारतात लाँच

किया इंडियाची ‘र्इव्ही ६’ भारतात लाँच

sakal_logo
By

किया इंडियाची
‘र्इव्ही ६’ भारतात लाँच
पुणे, ता. ७ : देशात जलद गतीने वाढत असलेल्या कारनिर्माता कंपनी ‘किआ इंडिया’ने भारतात ‘र्इव्ही : ६’ लॉँच केली आहे. या कारची मूळ किंमत ५९.९५ लाख रुपये आहे.
‘किआ इंडिया’ची मुख्य कंपनी असलेल्या ‘किआ कॉर्पोरेशन’ने शाश्वत मोबिलिटी जागतिक स्तरावर वाढविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. कंपनीकडून २०२७ पर्यंत ‘१४ बीर्इव्ही’ची सुरुवात करण्यात येणार आहे. किआ कॉर्पोरेशन पुढील पाच वर्षांमध्ये यासाठी अंदाजे २८ ट्रिलीयनची गुंतवणूक करणार आहे. यातून भारतामध्ये विक्री होणाऱ्या उत्पादनांचा विकास केला जाणार आहे. कंपनीचे २०४५ पर्यंत ‘शाश्वत मोबिलिटी सोल्यूशन प्रोव्हायडर’ बनणे आणि ‘कार्बन न्युट्रिलीटी’ प्राप्त करणे हे जागतिक स्वप्न पूर्णत्वास येताना दिसत आहे. ‘किआ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ताई-जिन पार्क, मुख्य विक्री अधिकारी म्युंगसिक सोहन आणि विक्री व विपणन प्रमुख हरदीप सिंग ब्रार या वेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22g02088 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top