मुथूट समूहाचे नवी दिल्लीत नवे कार्यालय सुरू सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत २० घरांचा ताबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुथूट समूहाचे नवी दिल्लीत नवे कार्यालय सुरू   
सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत २० घरांचा ताबा
मुथूट समूहाचे नवी दिल्लीत नवे कार्यालय सुरू सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत २० घरांचा ताबा

मुथूट समूहाचे नवी दिल्लीत नवे कार्यालय सुरू सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत २० घरांचा ताबा

sakal_logo
By

00778
नवी दिल्ली ः मुथूट समूहातर्फे हरियाणातील रेवडी भागातील २० गरजू कुटुंबांना घरे प्रदान करण्यात आली. या वेळी जॉर्ज जेकब मुथूट, जॉर्ज अलेक्झांडर मुथूट, जॉर्ज थॉमस मुथूट व अलेक्झांडर जॉर्ज मुथूट, डॉ. राजन सॅम्युअल आदी.

मुथूट समूहाचे नवी दिल्लीत नवे कार्यालय सुरू
सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत २० गरजूंना घरांचे वितरण

नवी दिल्ली, ता. २२ ः मुथूट समूहाची प्रमुख कंपनी मुथूट फायनान्सतर्फे नुकतीच हरियाणातील रेवाडी भागातील २० गरजू कुटुंबांना मुथूट आशियाना घरे प्रदान करण्यात आली. मुथूट समूहाच्या नवी दिल्लीतील नव्या कार्यालयाचे औचित्य साधून हा गृहप्रदान सोहळा झाला.
येथील मध्यवर्ती अलकनंदा परिसरात जॉर्ज मुथूट टॉवर-२ ही कॉर्पोरेट कार्यालयाची भव्य इमारत उभारण्यात आली असून कंपनीचे हे दुसरे कार्पोरेट कार्यालय आहे. याचे अनावरण परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त रॉबिन हिबू, मुथूट समूहाचे अध्यक्ष जॉर्ज जेकब मुथूट, व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज अलेक्झांडर मुथूट, सहव्यवस्थापकीय संचालक जॉर्ज थॉमस मुथूट व अलेक्झांडर जॉर्ज मुथूट, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजन सॅम्युअल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
२०१८ मध्ये केरळमधील विनाशकारी पुरानंतर मुथूट समूहाने सामाजिक जबाबदारी उपक्रमाचा एक भाग म्हणून मुथूट आशियाना पुनर्वसन प्रकल्प हाती घेतला असून या वर्षाच्या सुरुवातीला २०० हून अधिक घरे बांधून वितरित केली आहेत. हा प्रकल्प देशाच्या विविध भागांमध्येही राबवण्यात येत असून त्याअंतर्गत हरियाणातील गरजू कुटुंबांसाठी २० घरे बांधण्यात आली आहेत.
“मुथूट समूह देशाच्या विकासाचा अविभाज्य घटक असून देशाच्या प्रगतीमध्ये विश्वासार्ह भागीदार आहे,” अशा शब्दात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी मुथूट समूहाचे कौतुक केले. या वेळी कंपनीचे अध्यक्ष जॉर्ज जेकब मुथूट म्हणाले, ‘‘आशियाना प्रकल्प हा उपक्रम आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून समाजातील गरजू घटकांना उत्तम राहणीमान उपलब्ध करून देण्यासाठी तसेच देशातील गृहनिर्माण व स्वच्छताविषयक आव्हानांवर मात करण्यासाठी आम्ही हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या समूहाच्या व्यवसायातील वेगवान वाढीचा आम्हाला अभिमान आहे. नवी दिल्लीतील या कार्यालयाच्या उद्‍घाटनामुळे आमच्या व्यवसाय विस्ताराला चालना मिळणार आहे.’’


फोटो -PNE22T00778