एपीजी लर्निंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एपीजी लर्निंग
एपीजी लर्निंग

एपीजी लर्निंग

sakal_logo
By

‘डिजिटल मार्केटिंग’मधील करिअर संधी
पुणे, ता. ३० : इंटरनेट व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे सध्या डिजिटल मार्केटिंगला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. २१ व्या शतकात या क्षेत्राला किती महत्त्व आहे, यातील उपलब्ध आकर्षक करिअर संधी कुठल्या याबाबत माहिती देणारा विनामूल्य वेबिनार रविवारी (ता. ६) सकाळी दहा वाजता होणार आहे. वर्किंग व मिड-करिअर प्रोफेशनल्स, फ्रीलांसर, व्यावसायिक, बिझनेस गोल्स व मार्केटिंग स्ट्रॅटेजी एकमेकांना पूरक ठेऊन बिझनेस वाढवण्याची इच्छा असणारे स्वयंउद्योजक व व्यवस्थापक, वेगवेगळे सामाजिक व राजकीय कॅम्पेन चालवणारे फर्म सुरू करण्याची इच्छा असणारे आदींना या वेबिनारद्वारे डिजिटल मार्केटिंग क्षेत्राची तपशीलवार माहिती मिळेल.
नावनोंदणीसाठी संपर्क : ७३५०००१६०२.

‘अकाउंटिंग’मधील करिअर संधी
एपीजी लर्निंगच्या सर्वाधिक यशस्वी प्रशिक्षणाची बॅच उद्या मंगळवारी (ता. १) सुरू होत आहे. अकाउंटंट प्रोफेशनल बनण्यासाठी जे स्किल सेट गरजेचे असतात ते सर्व या कोर्समध्ये पूर्ण केले जाणार आहेत. व्यावसायिक संस्था आणि उद्योगांना पेरोल व फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी अकाउंटंट लागत असतात. हे एक उत्तम करिअर आहे. यातून पुढे मोठ्या संधीही उपलब्ध होतात. या प्रशिक्षणात इंडस्ट्रियल अकाउंटिंग, टॅली, डायरेक्ट टॅक्सेशन, जीएसटी, इन्कम टॅक्स, टीडीएस, पे-रोल कॉम्पोनन्ट्स, ईआरपी सॉफ्टवेअर यांसह एमएस एक्सेल व एमआयएस रिपोर्टिंग आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ३३,९०० रुपये.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३५०००१६०२