एपीजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एपीजी
एपीजी

एपीजी

sakal_logo
By

डिजिटल मार्केटिंगबाबत विनामूल्य वेबिनार
पुणे, ता. ३ : इंटरनेट व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे सध्या डिजिटल मार्केटिंगला खूप महत्त्व आले आहे. २१ व्या शतकात यातील उपलब्ध आकर्षक करिअर संधी व आव्हाने याबाबत माहिती देणारा विनामूल्य वेबिनार रविवारी (ता. ६) सकाळी दहा वाजता होणार आहे. वर्किंग व मिड-करिअर प्रोफेशनल्स, फ्रीलांसर, व्यावसायिक, मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून बिझनेस वाढवण्याची इच्छा असणारे स्वयंउद्योजक व व्यवस्थापक, वेगवेगळे सामाजिक व राजकीय कॅम्पेन चालवण्यासाठी फर्म सुरू करण्याची इच्छा असणारे आदींना या वेबिनारद्वारे डिजिटल मार्केटिंग क्षेत्राची तपशीलवार माहिती मिळेल.
नावनोंदणीसाठी संपर्क : ७३५०००१६०२.
क्यूआर कोड : PNE22T02719


डेटा सायन्सवर विनामूल्य वेबिनार
‘डेटा’ हे इंटरनेट व आयटी आधारित जगाची ओळख व वैशिष्ट्य बनले आहे. डेटावर आधारित तथ्ये, सांख्यिकीय संख्या आणि ट्रेंडच्या आधारे आजचे बिझनेस लीडर्स महत्त्‍वाचे निर्णय घेत आहेत. नव्या जगाचे हे परवलीचे तंत्रज्ञान नेमके काय आहे, डेटा सायन्स क्षेत्रातील करिअरसाठीचे मार्ग कोणते आहेत हे जाणून घेण्याची संधी वेबिनारमधून मिळणार आहे. रविवारी (ता. ६) सकाळी अकरा वाजता वेबिनार होणार आहे. वेबिनारमध्ये डेटा सायन्स आणि बिग डेटा ओव्हरव्ह्यू, डेटा सायन्समध्ये करिअर घडवण्याची आघाडीची कारणे, सध्या डेटा सायन्समध्ये करिअर सुरू करणे किती महत्त्‍वाचे आहे? यासाठीची कुठल्या कौशल्यांची आवश्यकता आहे कुठल्या नाही?, जॉब स्किल मॅपिंग आदींबाबत डोमेन व इंडस्ट्री एक्स्पर्ट असणारे अतुल फड हे मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ७३५०००१६०३.
क्यूआर कोड : PNE22T02716