जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये ‘फीटजी’चे विद्यार्थी चमकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये ‘फीटजी’चे विद्यार्थी चमकले
जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये ‘फीटजी’चे विद्यार्थी चमकले

जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये ‘फीटजी’चे विद्यार्थी चमकले

sakal_logo
By

जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये
‘फीटजी’चे विद्यार्थी चमकले
वेदांत तळेगावकरला एआयआर ८९ वी रॅंक
पुणे, ता. १२ ः अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या आयआयटी जेईई ॲडव्हान्स परीक्षेत एफआयआयटीजेईई (फीटजी)च्या पुणे केंद्रातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. वेदांत तळेगावकर या विद्यार्थ्याने अखिल भारतीय स्तरावर ८९ क्रमवारी पटकावली आहे. त्याचबरोबर तरंग शहा, राज चांडक, अमोघ भागवत, सार्थक लातुरिया आणि रिजुल बारोटी यांनी राष्ट्रीय स्तरावर पहिल्या ५०० विद्यार्थ्यांमध्ये स्थान प्राप्त केले आहे.
पुणे केंद्रप्रमुख राजेश कुमार कर्ण म्हणाले, ‘‘फीटजीच्या विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्समध्ये अनेक दशके आपले स्थान कायम ठेवले आहे. संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली असून, शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत दर्जात्मक शिक्षण पोचविण्याची आमच्या अनोख्या पद्धतीचे हे यश आहे. आमचे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. कालानुरूप शिक्षणपद्धती राबविणारी सर्वांत विश्वासार्ह आणि मूल्यवान संस्था म्हणून आम्ही सिद्ध झालो आहोत.’’ एआयआर रॅंकिंगमध्ये ८९ वे स्थान प्राप्त करणारा तळेगावकर म्हणाला, ‘‘आयआयटी जेईई ॲडव्हान्समधील माझी कामगिरी निश्चितच माझा विश्वास वाढविणारी आणि प्रेरणा देणारी आहे. फीटजीजेईईमध्ये असलेले उत्कृष्ट नियोजन आणि शिकवणी तंत्रज्ञानाचा निश्चितच माझ्या यशात वाटा आहे. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात परिश्रमपूर्वक अभ्यास केला, तर यश नक्की मिळते.’’ जेईई ॲडव्हान्समुळे आमच्या शिक्षण पद्धतीची उपयोजितता पुन्हा सिद्ध झाल्याचे संस्थेने म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r66113 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..