‘डेटा अॅनालिसिस’मध्ये घडवा करिअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डेटा अॅनालिसिस’मध्ये घडवा करिअर
‘डेटा अॅनालिसिस’मध्ये घडवा करिअर

‘डेटा अॅनालिसिस’मध्ये घडवा करिअर

sakal_logo
By

लोगो एपीजी

‘डेटा अॅनालिसिस’मध्ये घडवा करिअर
पुणे, ता. १४ : डेटा अॅनालिटिक्स प्रक्रियेद्वारे वेगवेगळे टूल्स वापरून डेटा तयार केला जातो आणि त्याचे विश्लेषण केले जाते. या डेटाने मिळालेल्या इन्साईट व्यवसायाशी संबंधित निर्णय घेण्याच्या हेतूंसाठी वापरल्या जातात. कंपन्या आता अधिक तंत्रज्ञान-चालित आणि वेगवान होत असल्याने, डेटा अनॅलिस्ट्स कर्मचाऱ्यांच्या शोधात आहेत. २०२२ मध्ये एकूण डेटा पूर्वीपेक्षा ५० पटीने अधिक होण्याचा अंदाज आहे. कंपन्यांना मोठ्या प्रमाणातील डेटाच्या उपलब्धतेसह अद्ययावत राहावे लागेल, जेणेकरून त्या स्पर्धेत मागे राहणार नाहीत. ‘डेटा अॅनालिसिस’ या आघाडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्यास मदत करणारा अभ्यासक्रम ३० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ५१ हजार रुपये.
संपर्क : ७३५०००१६०३
-----------
लोगो एसआयआयएलसी
डिहायड्रेशन प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा
पुणे, ता. १४ : हिरव्या पालेभाज्यांचे तसेच कांद्यासारख्या नाशवंत पदार्थांचे निर्जलीकरण (डिहायड्रेशन) करून भाजीपाला व नाशवंत पदार्थ भरपूर दिवस टिकवता येतात. अशा प्रक्रिया केलेल्या भुकटींना तसेच कच्च्या कांद्यावर प्रक्रिया करून तयार केलेल्या मूल्यवर्धित उत्पादनांना स्थानिक, परदेशी बाजारांतही वाढती मागणी आहे. डिहायड्रेशन तंत्रज्ञान, त्याची ओळख, फायदे, प्रक्रिया कशी करतात याचे मार्गदर्शन करणारी ऑफलाईन कार्यशाळा २४ व २५ सप्टेंबर रोजी आयोजिली आहे. यामध्ये निर्जलीकरण कसे करावे, त्यासाठी आवश्यक बाबी, डिहायड्रेशन तंत्रज्ञान, लागणारी यंत्रसामग्री, व्यवसायाच्या संधी, उद्योगासाठी अंदाजे गुंतवणूक, घरगुती सोलर ड्रायर, सुक्या भाज्यांची आहारमूल्य, गुणवत्ता, इन्स्टंट मिक्स, पॅकेजिंग, साठवण, विक्री व्यवस्थापन इ.बाबत मार्गदर्शन केले जाईल. प्रक्रिया उद्योजक, विद्यार्थी, गृहिणींसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४५०० रुपये.
संपर्क : ९१४६०३८०३१
ठिकाण- सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y24973 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..