महारेरा प्रमाणित रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी प्रशिक्षण

महारेरा प्रमाणित रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी प्रशिक्षण

एसआयआयएलसी लोगो

महारेरा प्रमाणित रिअल इस्टेट
एजंट होण्यासाठी प्रशिक्षण

एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या परीक्षांना सामोरे जाण्याची संधी

पुणे, ता. ११ : ‘सकाळ माध्यम समूहा’ची शैक्षणिक संस्था असणाऱ्या ‘एसआयआयएलसी’ला रिअल इस्टेट एजंट प्रमाणित प्रशिक्षणासाठी महारेराकडून अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. संस्थेतर्फे २० तासांचे ऑनलाईन तसेच ३ दिवसांचे ऑफलाईन प्रशिक्षण सुरू होत आहे. ऑनलाईन प्रशिक्षणाची पुढील बॅच १७ एप्रिलपासून सुरू होत आहे. तसेच तीन दिवसांच्या ऑफलाईन प्रशिक्षणाची पुढील बॅच सकाळ नगर, पुणे येथे लवकरच सुरू होणार आहे. महारेराने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंग व वास्तुशास्त्र या विषयांच्या कार्यशाळा प्रशिक्षणात आहेत.
नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी महारेराने बंधनकारक केलेले प्रमाणपत्र आता एजंटना सोबत बाळगावे लागणार आहे. महारेराने याबाबत स्पष्ट निर्देश दिले (महारेरा आदेश क्र. ४१/२०२३) आहेत. प्रमाणपत्र नसणाऱ्या एजंटना महारेराच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नोंदणीकृत एजंटमार्फतच मालमत्ता खरेदी करावी, असे आवाहनही महारेराने ग्राहकांना केले आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण पूर्ण करणे तसेच एप्रिल व मे महिन्यात महारेरातर्फे होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

चौकट
प्रतिव्यक्ती शुल्क : पाच हजार (अधिक जीएसटी)
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०३.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com